Dr Panjabrao Deshmukh Vyaj Savlat Yojana GR – डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शासन निर्णय

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा (Dr Panjabrao Deshmukh Vyaj Savlat Yojana) लाभ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. या व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जावर व्याज सवलत देण्यात येते. या योजनेमध्ये जे शेतकऱ्यांनी विहित मुदतीत कर्जाची परतफेड करतील त्यांना व्याज सवलत देण्यात येते.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (Dr Panjabrao Deshmukh Vyaj Savlat Yojana) ही राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पत संस्थांमार्फत व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सवलत देण्याचा निर्णय शासनाने दिनांक 24/11/1988 च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. त्यानुसार दिनांक 02/11/1991 च्या शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक 01/04/1990 पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी 30 जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे.

मात्र थकीत कर्जास, तसेच, मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जास सदरची योजना लागू नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत व बँकांमार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याज दराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे. दिनांक 03/12/2012 रोजीच्या शासन निर्णयानुसार रूपये 1.00 लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक 3% व त्यापुढील रूपये 3.00 लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक 1% दराने व्याज सवलत लागू करण्यात आलेली आहे. तसेच शासनाने दिनांक 11/06/2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये 3.00 लाख मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे 3% व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शुन्य टक्के (0%) दराने उपलब्ध होणार आहे.
राज्य शासनाच्या धोरणास अनुसरून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सं.क्र.5 नुसार अर्थसंकल्पीय तरतूदीचा निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती… 

शासन निर्णय –

सन 2023-24 वर्षात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत (2425 1009)-33 अर्थसहाय्य खाली रू. 36000.00 लाख वितरणासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी रु. 3600.00 लाख (रूपये छत्तीस कोटी फक्त) एवढा निधी सं. क्र. 5 नुसार अर्थसंकल्पीय तरतूदीच्या मर्यादेत असल्यामुळे वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

  • वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थ सं-2023/प्र.क्र.40/अर्थ-3, दिनांक 12/04/2023 मधील तपासणी सूचीप्रमाणे सर्व बाबींची सदर प्रकरणी पूर्तता होत आहे.
  • वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेला निधी संबंधित बँका / संस्थांस वितरीत करताना आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर रकमेबाबत उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे व त्याची प्रत शासनास सादर करावी.
  • सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य कार्यालयाने वित्त विभागाच्या उपरोक्त वाचा क्र.4 येथील शासन परिपत्रकातील सूचनांचे पालन करावे..
  • सदर तरतूद संबंधित संस्थांना अदा करण्यासाठी V0004 – सहायक निबंधक (अर्थसंकल्प आणि नियोजन), आयुक्त, सहकार, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर निधी आहरण करून हा खर्च किती वेळेत होईल, हे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पहावे. तसेच याबाबतचा अहवाल व विकास मंडळनिहाय खर्चाची माहिती वेळो वेळी शासनास पाठवावी.
  • सदरहू रक्कम मागणी क्र. व्ही 2 मुख्यलेखाशिर्ष- 2425 सहकार (107), सहकारी पत संस्थांना सहाय्य (02) व्याजात सवलत (02) (04) डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (कार्यक्रम) (दत्तमत) (24251009) 33 अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन 2023-24 या वर्षांसाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून सदर रक्कम खर्च करण्यात यावी.

शासन निर्णय पाहाण्या साठी येथे क्लिक करा. – https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202306011353489502.pdf

Dr Panjabrao Deshmukh Vyaj Savlat Yojana च्या निर्णयाबद्दल थोडक्यात –

  • निर्णय शीर्षक – डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शासन निर्णय (Dr Panjabrao Deshmukh Vyaj Savlat Yojana GR)
  • द्वारा सुरू – महाराष्ट्र शासन
  • राज्य – महाराष्ट्र राज्य
  • उद्देश – शेतकऱ्यांना शेतीच्या कर्जात सवलत मिळाऊन देणे. 
  • विभाग – सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग.
  • अधिकृत वेबसाइट – www.maharashtra.gov.in

शासन निर्णय पाहाण्या साठी येथे क्लिक करा. – https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202306011353489502.pdf

  • व्याजात सवलत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची मुदतीत परतफेड करतील, त्यामुळे बँकांची वसुली वाढून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
  • व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होईल. त्यातून वेळेवर कृषी निविष्ठांची खरेदी शक्य होईल. शेतकऱ्यांना उत्पादन वाढ मिळण्यास मदत होईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०६०११३५३४८९५०२ असा आहे.अश्याच नवनवीन आणि तुमच्यासाठी महत्वाच्या असतील अश्या आर्टिकल साठी तसेच सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी यांच्या वेबसाइट ला भेट द्या. आम्ही तुम्हाला 100% खरी माहिती देण्याचा प्रयत्न करू. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी contact us येथे क्लिक करा. आम्ही तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

 

Leave a Comment