गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना (Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Anudan Yojana) ही महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजना आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजना कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन या विभागांतर्गत राबवली जात आहे. महाराष्ट्र राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसने, आदी आपत्तिमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच कोणत्याही अन्य कारणामुळे होणारे अपघात झाल्यास आता शासन मदतीसाठी धावत आहे. अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते. शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिति निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा कालावधी 1 डिसेंबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2017 असा असून दि ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंत पूर्वी शेतकऱ्यांसाठी “शेतकरी जनता अपघात विमा योजना” राबवली जात होती. मात्र विमा कंपनीच्या प्रक्रियेमुळे अनेकदा अर्ज नाकारले जात किंवा निर्णय उशीरात येत असे. या त्रुटी दूर करण्यासाठी, 2023 मध्ये सुधारित स्वरूपाची अनुदान योजना मंजूर करण्यात आली आणि महाराष्ट्र सरकारने ही थेट अनुदान रूपात देण्यास सुरुवात केली.
शेती व्यवसाय करताना होणारे विविध आपघातांमुळे शेतकऱ्यास मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्यांना विमछत्र गोपीनाथ मुंडे शेतकरी शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत प्रदान करण्यात आले असून त्याचा लाभ त्या शेतकऱ्याला व त्यांच्या कुटुंबाला देण्यात येतो. प्रचलित गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कुटुंब विमाछत्राखाली येत नसल्यामुळे सदर योजनेची व्याप्ती वाढावून अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकाऱ्ऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही 1 सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी अथवा पाती, मुलगा व अविवाहित मुलगी यांपैकी कोणतीही एक व्यक्ति) असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्याच्या संदर्भात शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असून योजनेसंदर्भात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय / परिपत्रके अधिक्रमीत करण्यात आले आहेत. सबब, सुधारित स्वरूपातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजना (Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Anudan Yojana) वैशिष्ठे –
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2023 वैशिष्ठे खालीलप्रमाणे असतील :
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्यांना उपचार करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी ही एक महत्वाची योजना सुरू करण्यात आली आहे.
- या योजने अंतर्गत घेण्यात येणारी विमा प्रीमियमची रक्कम अत्यंत कमी आहे.
- या योजने अंतर्गत आकारली जाणारी विम्याची रक्कम 32.23 रुपये आहे जी सरकार मार्फत ओरीएन्टल इन्शुरेंस कंपनीला दिली जाते त्यामुळे शेतकऱ्याला विमा प्रीमियमची रक्कम भरण्याची गरज नाही.
- महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आली आहे जेणेकरून शेतकऱ्याला अर्ज करताना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांचा वेळ वाया जाऊ नये.
- महाराष्ट्र सरकारकडून या योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
- महाराष्ट्र राज्याच्या महसुली नोंदीनुसार 10 ते 75 वर्षे वयोगटातील, विमा पॉलिसीच्या तारखेला खातेधारक असलेला शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य जो विहित खातेदार म्हणून नोंदणीकृत नाही, ज्यामध्ये आई-वडील, पत्नी, मुलगा आणि लाभार्थीची अविवाहित मुलगी. वयोगटातील एकूण दोन व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व उंचावण्यासाठी तसेच त्यांना सामाजिक आणि आर्थिक विकासात मदत होईल आणि त्यांना सशक्त आणि स्वतंत्र बनविण्यात मदत होईल.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजना (Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Anudan Yojana) ठळक मुद्दे –
- योजनेचे नाव – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजना (Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Anudan Yojana)
- योजना सुरू केली – महाराष्ट्र राज्य सरकार
- विभाग – कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन
- अर्ज करण्याचा प्रकार – ऑफलाइन (Offline)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – Not Applicable
- लाभार्थी – आपघात झालेले शेतकरी.
- योजनेचे फायदे – अपघात झालेल्या शेतकाऱ्याना कमीतकमी 1 लाख ते 2 लाख रुपये अनुदान दिले जाईल.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजना (Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Anudan Yojana) मार्गदर्शक सुचना –
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे कल्याणकारी स्वरूप विचारात घेऊन ही योजना सुधारीत स्वरुपात राबविण्यासाठी योजनेच्या कार्यवाहीबाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात येत आहे.
- राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्याबरोबरच शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले व्यक्ती (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील एकुण २ जणांना विमाछत्र प्रदान करण्यासाठी सुधारित स्वरुपात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी विमाछत्र प्रदान करण्यासाठी कुटुंबाच्या “व्याख्येमध्ये शेतकऱ्याचे आई-वडील, पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात यावे.
- योजनेंतर्गत विमा संरक्षण सदर योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त शेतकन्यांना / त्यांच्या कुटुंबियांस प्रकरणपरत्वे खालील प्रमाणे लाभ अनुज्ञेय राहील.
- अपघाती मृत्यू झाल्यास रु.2,00,000/- इतकी नुकसान भरपाई दिली जाईल.
- अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रु.2,00,000/- इतकी नुकसान भरपाई दिली जाईल.
- अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किवा एक पाय निकामी झाल्यास रु.1,00,000/- इतकी नुकसान भरपाई दिली जाईल.
योजना कार्यान्वयीन यंत्रणा :
आयुक्त (कृषि) यांचे मार्फत ई निविदा प्रक्रीया राबवून महसूल विभागनिहाय विमा कंपनी / कंपन्या व विमा सल्लागार कंपनी/कंपन्यांची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून त्या त्या महसूल विभागासाठी ठराविक कालावधीसाठी राज्यस्तरीय समितीच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात येईल.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजना (Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Anudan Yojana) लाभार्थी पात्रता :-
महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला उक्त मुददा क्र.२ अन्वये शेतकऱ्यांच्या कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील कोणताही १ सदस्य.
दावा अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे :-
- लाभ घेण्याकरीता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे-
- विहीत नमुन्यातील पूर्वसूचनेचा अर्ज (सहपत्र क्र. १)
- पूर्वसूचनेसोबत आवश्यक कागदपत्रे –
- ७/१२ उतारा,
- मृत्यू दाखला,
- प्रथम माहिती अहवाल,
- विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यू. पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्पदंश / विचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल, घटनास्थळ पंचनामा,
- वयाचा दाखला.
सदरचा दावा दुर्घटनेनंतर शक्यतो ४५ दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.
- विहीत नमुन्यातील अर्ज (सहपत्र क्र. १) सदर अर्जासोबत प्रस्तावासाठी अपघाताच्या प्रकारानुसार आवश्यक सर्व कागदपत्रे सहपत्रित करण्यात यावी. अप्राप्त कागदपत्रांची यादी त्रुटीपत्रकात तालुका कृषि अधिकारी कार्यालयात नोंदवहीत संगणक प्रणालीमध्ये पडताळणी करून नोंदवण्यात यावी.
- अपघातग्रस्ताच्या वयाच्या पडताळणीकरीता जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र / ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालविण्याचा परवाना किंवा पारपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किया उपलब्ध नसल्यास निवडणूक ओळखपत्र (स्वयंसांक्षाकीत केलेले).
- अपघातग्रस्त नोंदणीकृत खातेदाराच्या वयासंबंधी वरीलपैकी कोणताही पुरावा उपलब्ध होऊ न शकल्यास विमा दावेदाराने/ कुटुंबातील सदस्याने अपघातग्रस्त खातेदाराच्या वयासंबंधी शपथपत्र दिल्यास असे शपथपत्र ग्राहय धरण्यात येईल.
- खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका राजपत्रित अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेली प्रत.
- शेतकरी म्हणून त्याचे नावाचा समावेश असलेला ७/१२ किंवा ८-अ नमुन्यातील मूळ उतारा.
- मृत्युचा दाखला स्वयंसाक्षाकीत केलेली प्रत.
- घटनास्थळ पंचनामा स्वयंसांक्षाकीत केलेली प्रत.
- प्रस्ताव प्राप्त झाल्यावर पडताळणी करतांना तालुका कृषि अधिकारी कार्यालय स्तरावर मुळ कागदपत्रे तपासून सदर प्रमाणपत्रे सांक्षाकीत करावीत.
लाभ कधी मिळेल –
विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.
लाभ कधी मिळणार नाही –
नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा विमा संरक्षणात समावेश नाही.
अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
पूर्ण लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. अश्याच नवनवीन आणि तुमच्यासाठी महत्वाच्या असतील अशा आर्टिकल साठी तसेच सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी यांच्या वेबसाइट ला भेट द्या. आम्ही तुम्हाला 100% खरी माहिती देण्याचा प्रयत्न करू. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी contact us येथे क्लिक करा. आम्ही तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू.