MPSC Combine Group B Prelims 2024 Notification – महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ जाहिरात

आज आपण महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ जाहिरात (MPSC Combine Group B Prelims 2024 Notification) बद्दल माहिती देणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पदासाठी भरती 2024 (MPSC Combine Group B Prelims 2024) अंतर्गत एकूण 480 एवढी पद संख्या असून ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भारती बाबतचे परिपत्रक दि. 09/10/2024 रोजी प्रसिद्ध झालेले असून, हे परिपत्रक उप सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या कार्यालया मार्फत प्रसिद्ध झालेले आहे. हि परीक्षा रविवार दि. 05 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारखेपूर्वी दिलेल्या नमूद संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकता. ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी लिंक खाली दिली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगतील संयुक्त पूर्व परीक्षा गट ब या श्रेणीतील सहाय्यक कक्ष आधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक हि पदे भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक. उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने mpsconline.gov.in या संकेतस्थळावर Registration या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर New User Registration या लिंक मध्ये जाऊन अर्ज मागवले जाणार आहेत. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.

ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची तारीख –

  • दिनांक 14 ऑक्टोबर 2024.

ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

  • दिनांक 04 नोव्हेंबेर 2024.

MPSC Combine Group B Prelims 2024 जाहीरीतीबद्दल थोडक्यात

  • पदाचे नाव : सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI), पोलिस उपनिरीक्षक (PSI)
  • पदसंख्या : 480
  • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी अथवा पदविका धारण केलेला उमेदवार
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी
  • अर्ज पद्धती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सांकेतिक स्थळावर (Website) ऑनलाइन पद्धतीने
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबेर 2024
  • निवड प्रक्रिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षे अंतर्गत
  • जाहिरात : mpsc.gov.in/adv_notification/8
  • अधिकृत वेबसाइट : mpsc.gov.in आणि mpsconline.gov.in/candidate

MPSC Combine Group B Prelims 2024 Syllabus (अभ्यासक्रम)

या परीक्षेसाठी उपयुक्त विषय पुढील प्रमाणे :
पूर्व परीक्षा :
अर्थशास्त्र
राज्यशास्त्र
इतिहास
भूगोल
गणित आणि बुद्धिमत्ता
विज्ञान
चालू घडामोडी

MPSC Combine Group B Prelims 2024 ची एकूण पदे :

सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO): 54 पदे
राज्य कर निरीक्षक (STI): 209 पदे
पोलिस उपनिरीक्षक (PSI): 216 पदे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संस्थात्मक पद : 1 पद
एकूण : 480 पदे

पात्रता :

  • भारतीय नागरिक असावा.
  • कोणत्याही शाखेची पदवी अथवा पदविका धारण केलेला उमेदवार
  • मराठी भाषेचे ज्ञान असावे.

वयोमार्यादा :

  • जाहिरातीत नमुद केलेल्या पदांसाठी वयोमर्यादा किमान वय 18 वर्ष असावे व कमाल वय अमागास वर्गीय उमेदवारासाठी 38 आणि मागास वर्गीय उमेदवारासाठी 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक, प्राविण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी कमाल वय 43 वर्षांपेक्षा जास्त आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 45 पेक्षा जास्त नसावे. दिव्यांग उमेदवार पोलिस उपनिरीक्षक पदासाठी अपात्र असतील.
  • उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षमः
  1. भूकंपग्रस्त / प्रकल्पग्रस्त उमेदवार यांच्या साठी कमाल वयाची अट ही 43 वर्षे इतकी असेल.
  2. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ५ वर्षांपर्यंत.
  3. पात्र खेळाडूंच्या बाबतीत 43 वर्षांपर्यंत.
  4. माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत कमाल वय 43 पेक्षा जास्त नसावे.
  5. अनाथ उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षांपर्यंत.
  6. दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत 45 वर्षांपर्यंत.

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेची पदवी अथवा पदविका धारण केलेला उमेदवार.

शारीरिक पात्रता :

शारीरिक पात्रता केवळ पोलिस उपनिरीक्षक पदाकरीता असेल.
पुरुषांसाठी :
उंची 165 से. मी. (कमीत कमी)
छाती – न फुगवता 79 से. मी. आणि छाती फुगवण्याची क्षमता किमान 5 से. मी. असणे आवश्यक.
महिलांसाठी :
उंची किमान 157 से. मी. असणे आवश्यक.

वेतन व वेतन श्रेणी :

सर्व संवर्गांसाठी वेतन श्रेणी ही S-14 असणार आहे. सर्व संवर्गांसाठी वेतन हे रुपये 38600 – 122800 अधिक महागाई भत्ता व नियमाद्वारे देय इतर भत्ते.

अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क :

संयुक्त पूर्व परीक्षे साठी :
  • अमागस (open) वर्गीय उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 394/- रु.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 294/- रु.
  • आर्थिक दुर्बल घटक उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 294/- रु.
  • अनाथ उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 294/- रु.
  • माजी सैनिक अमागस (open) वर्गीय उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 394/- रु.
  • माजी सैनिक मागासवर्गीय उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 294/- रु.
  • माजी सैनिक आर्थिक दुर्बल घटक उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 294/- रु.
  • माजी सैनिक अनाथ उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 294/- रु.
मुख्य परीक्षे साठी :
  • अमागस (open) वर्गीय उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 544/- रु.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 344/- रु.
  • आर्थिक दुर्बल घटक उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 344/- रु.
  • अनाथ उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 344/- रु.
  • माजी सैनिक अमागस (open) वर्गीय उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 544/- रु.
  • माजी सैनिक मागासवर्गीय उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 344/- रु.
  • माजी सैनिक आर्थिक दुर्बल घटक उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 344/- रु.
  • माजी सैनिक अनाथ उमेदवारासाठी परीक्षा शुल्क : 344/- रु.

अर्ज करण्याची पद्धत :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सांकेतिक स्थळावर (Website) ऑनलाइन पद्धतीने.

पूर्ण लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. अश्याच नवनवीन आणि तुमच्यासाठी महत्वाच्या असतील अशा आर्टिकल साठी तसेच सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी यांच्या वेबसाइट ला भेट द्या. आम्ही तुम्हाला 100% खरी माहिती देण्याचा प्रयत्न करू. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी contact us येथे क्लिक करा. आम्ही तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

Leave a Comment