राज्यातील महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyanantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. 1500/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyanantri Mazi Ladki Bahin Yojana) या योजनेची अमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyanantri Mazi Ladki Bahin Yojana) या योजनेसाठी ज्या ऑनलाइन पोर्टल द्वारे अर्ज भरू शकता त्या पोर्टल चे नाव ladkibahin.maharashtra.gov.in असे आहे. हे पोर्टल महाराष्ट्र सरकारद्वारे ऑपरेट केले जात आहे. आज दि. 25/02/2025 पर्यंत 11270261 एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आहे आहेत, तसेच 10669139 एवढ्या आर्जाना मंजूरी मिळाली आहे. या योजनेची अंमलबजावणी महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य या विभागाद्वारे केली जात आहे.
अर्ज प्रक्रिया :
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyanantri Mazi Ladki Bahin Yojana) या योजनेचे अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन फॉर्म पद्धत या पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.
- ज्या लाडक्या बहिणींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षीका किंवा मुख्यसेविका यांच्या मार्फत तसेच सेतु सुविधा केंद्र किंवा ग्रामसेवक किंवा समूह संसाधन व्यक्ति (CRP) तसेच आशा सेविका, वॉर्ड अधिकारी किंवा सिटी मिशन मॅनेजर (CMM), मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- या योजनेचा अर्ज भरून घेण्यासाठी कोणत्याही पद्धतीचे शुल्क आकरले जाणार नाही.
- आर्जदाराने त्याचे नाव हे आधार कार्ड मध्ये आहे त्या प्रमाणे टाकायचे आहे. तसेच जन्मदिनांक हा सुद्धा आधारकार्ड प्रमाणे असावा. अर्जदाराने बँकेचा तपशील व मोबाइल नंबर अचूक देणे गरजेचे असणार आहे.
पात्रता :
- माझी लाडकी बहीण योजना (Mukhyanantri Mazi Ladki Bahin Yojana) या योजनेसाठी अश्याच महिला पात्र असतील ज्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या महिला अर्ज करण्यासाठी पात्र असतील.
- अर्जदार महिला ही कमीत कमी 21 वर्षे पूर्ण असलेली असावी तसेच अर्जदार महिलाचे वय हे 65 वर्षे यापेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु. 2,50,000/- पेक्षा जास्त नसावे.
अपात्रता :
- माझी लाडकी बहीण योजना (Mukhyanantri Mazi Ladki Bahin Yojana) या योजनेसाठी असे उमेदवार अपात्र असतील ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे 2,50,000 पेक्षा जास्त आहे.
- ज्या कुटुंबातील सदस्य हे नियमितपने आयकर भारतात असे कुटुंब तसेच कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र असतील.
- ज्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. तथापि रु. 2,50,000 पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रनांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
- सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील तर ते लाभार्थी अपात्र असतील.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार असतील असे कुटुंब या योजनेसाठी अपात्र असेल.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आहेत अश्या व्यक्तीचे कुटुंब या योजनेसाठी अपात्र असेल.
- ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे त्या कुटुंबातील व्यक्ति या योजनेसाठी अपात्र असतील.
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच महाराष्ट्राचा रहिवाशी असलेला दाखला. प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड किंवा 15 वर्ष पूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यांपैकी कोणतेही एक.
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड किंवा 15 वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यांपैकी कोणतेही एक.
- वार्षिक उत्पन्न 2,50,000/- पेक्षा कमी असणे आवश्यक.
- पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही.
- शुभ्र शिधापत्रिका म्हणजेच रेशनकार्ड किंवा कोणतेही रेशनकार्ड नसेल तर वार्षिक उत्पन्न 2,50,000/- पेक्षा कमी असणे आवश्यक असेल.
- नवविवाहितेच्या बाबतीत रेशनकार्ड वर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अश्या नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
- बँक खाते आधार ला लिंक असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो.
ही सर्व माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइट वरुण मिळवली आहे. नवीन अर्जदारांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. सर्व वाचकांचे हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल मनपूर्वक आभार. अश्याच नवनवीन आणि तुमच्यासाठी महत्वाच्या असतील अश्या आर्टिकल साठी तसेच सरकारी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी भाषेत मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला आवश्य भेट द्या. आम्ही नेहमी तुम्हाला 100% खरी आणि महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करू. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी contact us येथे क्लिक करा. आम्ही तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू.